Wednesday 25 April 2012

नंदन निलेकणी : एक दूरदृष्टी ठेवणारा तंत्रज्ञ

नावातच ज्यांच्या नंदन आहे असे हे उत्तर कर्नाटक मधील सिरसी या गावी जन्माला आले. त्यांच्याबद्दल नेटवर बरीच माहिती उपलब्ध आहेच, म्हणून मी काही तीच पुन्हा  सांगणार नाही. निलेकणी हे एक दूरदृष्टी असणारे तंत्रज्ञ कसे हे सांगणार आहे.
त्यांना घरातूनच अभ्यासपूर्ण वातावरण मिळाले. त्यांनी ठरविले होते मोठा माणूस व्हायचे तसे ते झालेही. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण आयआयटी मुंबई येथून १९७८ ला पूर्ण केले. त्यांची पहिली कंपनी ही पटनी कम्प्युटर कंपनी होती. तेथे त्यांची मुलाखत ही खुद्द एन. नारायणमूर्ती यांनी घेतली होती. यावरूनच त्यांची बुद्धीमत्ता आपल्याला स्पष्ट होते. आपल्या आयटी प्रवासात त्यांनी भरपूर प्रमाणात चढउतार पाहिलेत.


नंदन निलेकणी 


भारताच्या ‘अनोखे नागरिक ओळखपत्र’ (यूआयडी) मोहिमेचे विद्यमान प्रमुख नंदन निलेकणी यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे प्रख्यात स्तंभलेखक थॉमस फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ असे विधान केले. त्यावेळेस माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वांनाच निर्माण झालेल्या समान संधींविषयी त्यांना बोलायचे होते. त्यांची दृष्टी ही अतिशय स्पष्ट आणि प्रगतीशील आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर हा देशासाठी केला. लोकपाल आणि भ्रष्टाचारावर त्यांनी हाच एक मार्ग नसून त्यासाठी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेथे अमेरिका ४ जी वापरते तेथे भारत अजूनही २ जी त अडकलेला आहे. भारतात निलेकणी सारखे आयटी तज्ञ आहेत पण खंत ती एकाच त्यांच्या बुद्धीचा वापर किंवा त्याला योग्य सहयोग, मान दिला जात नाही.

नंदन निलेकणी

आपल्या ३० वर्षाच्या आयटी कारकिर्दीत नाव कमविणारे निलेकनींवर पंतप्रधान यांनी एक महत्वाची जबाबदारी टाकली ती म्हणजे त्यांना राष्ट्रीय ओळखपत्र प्राधिकरण प्रमुखाची याला ते योग्यरित्या सांभाळता आहेतच. विशेषतः त्यांनी याचबरोबर सिलेंडर सुद्धा ऑनलाईन मिळणार यासाठीही प्रयत्न केलेत. यांसारखे माणसे ही केवळ नावाने नाही तर त्यांनी केलेल्या कामांनी ओळखली जातात यात तिळमात्रही शंका नाही.

या माणसाने आपल्या बुद्धीचा वाईट गोष्टीसाठी वापर कधीच केला नाही. एका जागतिक क्रमवारीतील आयटी कंपनीचे सह संस्थापक पद सोडून सरकारी कार्यात आपला सहभाग नोंदविणारे नंदन निलेकणी हे मोजक्या भारतीयांपैकी एक. त्यांचा एक गुण प्रत्येक तरुणाला घेण्यासारखा आहे तो म्हणजे "कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला कमी लेखू नये. त्याचा डटके मुकाबला करावा." 


निलेकणी हे २००२ ते २००७ पर्यंत इन्फोसिस चे सीईओ होते. त्यानंतर त्यांना २००९ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रीचा दर्जा असलेल्या पदावर नियुक्त केले ते म्हणजे Unique Identification Authority of India च्या चेयरमनपदी.  या लेखासाठी निलेकनींवर लिहायचे ठरवल्यावर त्यासाठी भरपूर वाचावे लागले. अभ्यास करावा लागला.


चला तर पुन्हा भेटूया एक नवीन आणि आयटीसंपन्न असलेल्या व्यक्तीच्या माहितीसोबत याच तुमच्या आपल्या आयटी च्या गावात.


No comments:

Post a Comment