नावात आणि कामात भरपूर फरक असतो, याचप्रमाणे इतिहासात आणि प्रत्यक्षात ही असतो. या गोष्टीचा संबंध गोडबोलेंशी येतो. त्यांच्या जीवनात आलेले दोन कलाटणी देणारे क्षण आलेत. तेव्हापासून तर आत्तापर्यंत त्यांनी मागे वळून पहिले नाही, हे ते आपल्या भाषणात नेहमी सांगतात. नाशिक येथील HPT Art's And RYK Science College मध्ये व्हीजन फॉर युथ या पत्रकारिता आणि अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
त्यांच्या जीवन परिचयाची आपण माहिती घेऊया :-
१. शालान्त परीक्षेत राज्यात १६ वा, विद्यापीठात पहिला क्रमांक
२. गणितात आयआयटीपर्यंतच्या जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं
३. आयआयटी मुंबईचे केमिकल इंजिनिअर
४. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत ३२ वर्षं जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत अनुभव
५. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५० हून जास्त वेळा जगप्रवास
६. पटणी, सिंटेल, एल अँड टी इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या अनेक पटीच्या जगभर वाढीमध्ये हातभार
७. मॅकग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी कम्प्युटरवरची चार मोठी पाठ्यपुस्तकं, चिनीसकट अनेक भाषांत अनुवाद
८. मराठीतून संगणकयुग (कम्प्युटर), बोर्डरूम (व्यवस्थापन), नादवेध (संगीत), किमयागार (विज्ञान), अर्थात (अर्थशास्त्र), गुलाम (गुलामगिरी), थैमान चंगळवादाचे (चंगळवाद), नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजी), स्टीव्ह जॉब्ज (चरित्र), मनात (मानसशास्त्र) अशा अनेक पुस्तकांचं लेखन; नादवेध, किमयागार , अर्थात आणि मनातला राज्यशासनासह अनेक मानाचे पुरस्कार
९. याशिवाय झपूर्झा (इंग्रजी साहित्य), तंत्रमंत्र (तंत्रज्ञान), प्राणिजगत (प्राण्यांविषयी), बखर संगणकाची (संगणकाचा इतिहास), वैद्यकायन (वैद्यकशास्त्राचा इतिहास), विज्ञानवाद (विज्ञान), मनात (मानसशास्त्र) अशा अनेक वाचकप्रिय लेखमाला
१०. आयबीएमतर्फे दोनदा, पंतप्रधानांकडून दोनदा, उद्योगरत्न, आयआयटीचा अत्यंत बहुमानाचा डिस्टिंग्विश्ड ऍल्युमिनस, पं. भीमसेन जोशींच्या हस्ते कुमार गंधर्व, सह्याद्री वाहिनीचा नवरत्न, इंद्रधनू, अर्थशास्त्रासाठी पारनेरकर पुरस्कार, मानसाशास्त्रासाठीचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा सोनोपंत दांडेकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार
११. २०११ साली पुणे येथे पार पडलेल्या पहिल्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे अध्यक्ष
१२. आशियाना नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात पुढाकार
१३. आयआयटी नंतर भिल्ल आदिवासी चळवळीत सहभाग
१४. सध्या सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर(श्री. अच्युत गोडबोले यांच्या संकेतस्थळावरून साभार :- http://achyutgodbole.com )
Nice article... Gopal
ReplyDelete