बिल गेट्स ची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आपली पण स्वतःची एक कंपनी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या सुहास गोपीनाथ ची ही गोष्ट.....!!
Mr. Suhas Gopinath |
एखाद्या मोठ्या आयटी कंपनीचा सीईओ होणारे लोक आपण पहिले आहेत. परंतु वयाच्या १४ व्या स्वतःची वेबसाईट बनवून एका कंपनीची मुहूर्तमेढ करणारा सुहास गोपीनाथ म्हणजे युवकांसाठी एक आदर्शच ! हे यश सुहास ला सहजासहजी मिळालेले नाही. आपल्या अमुलाग्र बुद्धीने १४ व्या वर्षीच हा चमत्कार करणारा सुहास गोपीनाथ हा आयटी सिटी बंगळूरचा. त्याचा जन्म ४ नोव्हेंबर १९८६ चा.
सुहास तसा मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्याला केवळ १५ रुपये खर्चाला मिळायचे. त्यासोबत एका इंटरनेट कॅफे वर नौकरी करून आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची सुरुवात केली. तेथूनच हा प्रवास सुरु झाला.
सुहास तसा मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्याला केवळ १५ रुपये खर्चाला मिळायचे. त्यासोबत एका इंटरनेट कॅफे वर नौकरी करून आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची सुरुवात केली. तेथूनच हा प्रवास सुरु झाला.
सुहासने ही कंपनी सुरु केली त्यावेळेस कोणाला वाटले ही नव्हते की ही कंपनी अब्जावधीची उलाढाल करेन. पण पाहता पाहता 'ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड' नावाची कंपनी थेट कॅलिफोर्निया पर्यंत पोहोचली. या कामगिरीबद्दल सुहास गोपीनाथला कर्नाटक सरकारच्या पुरस्कारासह आंतरराष्टीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यात २००७ मध्ये युरोपियन संसदेचा यंग अचीव्हर अवार्ड, २००८-०९ दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिलेला यंग ग्लोबल लीडर्स अवार्ड याचा समावेश आहे.
Suhas Gopinath with Great Mr. A.P.J. Abdul Kalaam |
आज सुहास गोपीनाथ हे ५०० हून जास्त कर्मचारी असलेल्या ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड या कंपनीचे प्रेसिडेंट आहेत. जगातील विविध संस्थांनी गौरविलेले हे व्यक्तिमत्व भारतीय असल्याचा आम्हाला अभिमानच वाटतो. बीबीसी, वाशिंग्टन टाईम्स, दि एज आदींनीही गौरव केला आहे.
भारतीय माध्यमे त्यांना हिंदुस्तानी बिल गेट्स म्हणून संबोधतात. कारण सुहासचे प्रेरणास्त्रोत बिल गेट्स हेच आहेत. स्वतः बिल गेट्स यांनी भारतभेटीत "मी तुझ्यापासून सावध राहिले पाहिजे" असे सांगितले.
यावरून सुहास गोपीनाथ यांचे कर्तृत्व लक्षात येते. सुहासचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे एवढ्या लहान वयात आकाशाला गवसणी घालूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. हे विशेष.
यावरून सुहास गोपीनाथ यांचे कर्तृत्व लक्षात येते. सुहासचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे एवढ्या लहान वयात आकाशाला गवसणी घालूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. हे विशेष.
No comments:
Post a Comment