Wednesday, 18 April 2012

'आयटी' चा भगीरथ - स्टीव्ह जॉब्ज

Sir Steve Jobs

आय फोन चे निर्माते असणारे स्टीव्ह जॉब्ज नुकतेच आयटी जगताला अलविदा करून गेले. मनाला चटका लावणारी ही गोष्ट माझ्या वाढदिवशी घडावी हा दुखद योगायोगच. पण नियती समोर कोणाचे चालत नाही, असो वयाच्या १९ व्या वर्षी इलेक्ट्रिकची माहिती आणि मित्राची सोबत घेऊन Apple  कंपनीची सुरुवात मुहूर्तमेढ रोवली. ती केवळ १३०० $ च्या तोडक्या भांडवलावर हे विशेष. आपल्या अपरिमित आत्मविश्वासाने आणि जिद्दीने त्यांनी कंपनीचे भाग भांडवल ६० कोटी $ वर पोहोचविले.
१९८४ मध्ये जगाला एक अवलिया माणसाची ओळख खऱ्या अर्थाने झाली ती  Apple ने काढलेल्या त्यांच्या पहिल्या उत्पादनाने. पुढे स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनात बऱ्याच अश्या गोष्टी घडल्या ज्याने त्यांना जगाला जिंकण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या प्रत्येक भाषणात एक नाविन्यता आणि आत्मविश्वास वाटायचा. विशेषतः लहानपणी केलेल्या खोड्या आणि आत्ताचे जीवन यांचा सुरेख संगम ते घालत. त्यांच्या प्रत्येक हरकतींवरून ते स्पष्टही होत असे. कधी कधी एकांतात रमणारे स्टीव्ह अचानक गोतावळ्यात येऊन आपल्या शैलीत गाणेही गुणगुणायचे. वाद आणि त्यांची चांगलीच गट्टी होती. त्यात कॉलेज मधून हकालपट्टी, Apple मधून पायउतार, नावाची चोरीचा वाद असे एक न अनेक वाद सांगता येतील. परंतु या आय.टी. च्या भगीरथाने आत्मविश्वासाने, साहसाने या संकटांचा सामना करून जगात आयटी ची गंगा अवतरण्यात खरी भूमिका बजावली. हे नाकारता येणे शक्यच नाही.

वयाच्या १५ व्या वर्षीच युवक-युवती आय फोन वापरायला शिकतात ते केवळ या सर स्टीव्ह जॉब्ज यांच्यामुळेच. पण त्याचबरोबर ते व्यसनाधीन ही तितक्याच लवकर होतात, याउलट स्टीव्ह जॉब्ज हे २५ व्या वर्षीच लक्षाधीश बनले होते. सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या माझ्यासारख्या युवकांनी ही प्रेरणा घेऊन आपले करियर सेट करणे गरजेचे आहे न की व्यसनाधीन होणे. युवकांच्या हातातले खेळणे म्हणजे मोबाईल, आय फोन, आय पॉड, स्मार्ट फोन हे सर्व ह्याच भगीरथाच्या देणग्या आहेत.

सर स्टीव्ह जॉब्ज
ज्यावेळेस स्टीव्ह यांनी बिल गेट्स ची भेट घेतली त्यावेळी आपल्या नम्र आणि सोज्वळ स्वभावाची जाणीव पूर्ण जगाला करून दिली. आय टी विश्वातील एक धगधगता योद्धा आपल्यातून निघून गेल्याचे शल्य कधीही न संपणारे आहे. आय-फोन, आय-पॉड, आय-मोव्ही, आय-ट्युन्स अशा 'आय'संपन्न गोष्टी या आय टी च्या ग्लोबल गावात म्हणजेच जगभर पसरवल्या. खऱ्या अर्थाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परिवर्तनाचे वारे आणि ते सातत्याने काहीतरी नवीन आणून टिकवून ठेवणे हे केवळ सर स्टीव्ह जॉब्ज च करू शकतात असे वाटते.
एक दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला हा माणूस जेव्हा एखाद्या कंपनीचा सीईओ होतो, तेव्हा त्यांच्या रुबाबापेक्षा  त्यांच्या मनातील आय टी साठी असणारी धडपड महत्वाची वाटते. केवळ ५६ वर्ष जगून या माणसाने अनेक बदल घडवून आणले. आज सोशल साईट्स क्रांती होत असेल परंतु 'आय टी' उत्क्रांती सर स्टीव्ह जॉब्ज यांनीच घडवून आणली असे मला वाटते.
शेवटी सर स्टीव्ह यांचे एकाच वाक्य सांगावेसे वाटते की जे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतांना सांगितले ते म्हणजे, प्रवाहाविरुद्ध जाण्याअगोदर आपण प्रवाहासोबत चालणे सूद्धा शिकले पाहिजे जेणेकरून त्यांच्याविरुद्ध गेल्यावर आपल्याला येणाऱ्या संकटांचा मुकाबला करणे सोपे जाईल.

5 comments:

  1. गोपाळ, आपला ब्लॉग अतिशय सुरेख आहे, आणि पोस्ट देखील. स्टीव्ह जॉब्स सारखी काही माणसे असतात जी आपल्याला त्यांच्या कृतीमधुन बरेच काही सांगुन जातात. कृपया अजुन नवीन माहिती टाकावी. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. गोपाळ, स्टीव्ह जॉब्स बद्दल खूप छान माहिती पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद!
    अजून माहिती त्यांच्या बायोग्राफीत नक्की मिळेल.
    "Steve Jobs: The Exclusive Biography "
    धन्यवाद !

    - अमोल भोसले

    ReplyDelete
  3. जितेंद्र थोरात20 April 2012 at 14:38

    स्टीव्ह जॉब्स यांनी केलेले कार्य हे 'आत्मविश्वास' या संज्ञेच मूर्तीमंत उदाहरण आहे. आत्मविश्वासाच्या बळावर मानव अतिविशाल कार्य सुद्धा करू शकतो. मी इथे कुठलीही तुलना करू इच्छित नाही पण आपले सर्वांचे दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केवळ ५१ वर्षच मिळालेल्या जीवनात भव्य अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माझ्या मते देशासाठी कुठलेही कार्य न करता केवळ करोडो रुपये कमावून सिगरेट चा धूर काढणाऱ्या नट, नट्या आणि क्रिकेट खेळाडूंपेक्षा अशा महान व्यक्तींचे आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास तरुण पिढी खूप जास्त प्रगती करू शकते.

    ReplyDelete
  4. Thanks All of you Buddies............@@!! I'll try more better than that.

    ReplyDelete
  5. yar mast tayyar kele ahe ekdam solid disat ahe..........
    amruta gholap

    ReplyDelete