Information Technology News and Updates

This page includes all kind of Information Technology News and Updates around the World.

मीटअप : जगातील स्थानिक समूहाचे सर्वात मोठे नेटवर्क



मीटअप या सोशल नेटवर्क चा फेसबुक साठी एक उत्तम पर्याय आहे. या साईटचे विशेष म्हणजे यावर आपण लोकल म्हणजेच स्थानिक समूह तयार करून त्यांचे कार्यक्रम ठेवू शकतो. त्याची प्रसिद्धीही करू शकतो. मीटअप ही सोशल नेट्वर्किंग साईट खास करून समूहांसाठी खूपच उपयोगी आहे. यामध्ये तुम्ही आपले गृप सोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करू शकतात. तुम्ही स्वतःचा ग्रुपसुद्धा बनवू शकतात.
यावर ९००० पेक्षा जास्त समूह एका दिवसात तयार होतात. ते एकमेकांच्या अडचणी, गोष्टी शेअर करतात. मीटअपचे ध्येय स्थानिक समुदायातील लोकांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करणे आणि जगभरातील लोकांना ते करण्यासाठी मदत करणे आहे. मीटअपनुसार लोकांना विकसित करण्यासाठी त्यांनी एकत्रित गट बनविले तर ते त्यांचे वैयक्तिक जग, किंवा संपूर्ण जग बदलू शकता असा विश्वास आहे. मग जर तुम्ही देखील कोणता समूह किंवा ग्रुप तयार करणार असाल तर मग मीटअप त्यासाठी एक छान सोशल नेट्वर्किंग साईट आहे. यावर सध्या १५.९२ दशलक्ष सभासद असून, गट/ समूह १४२.३१९ आहेत. ही साईट १९६ देशांमध्ये सेवा देते.

http://www.meetup.com

--------------------------------------------------------------------------------------------------------


मोबाईल फोन किती हानिकारक

आपण सर्रासपणे मोबाईल फोन वापरतो आणि त्याचे अनेक फायदे आहेत असेही सांगतो. पण का आपण कधी यापासून आपल्या आरोग्यास होणारया हानीचा विचार केला आहे का? नाही ना तर मग जाणून घेऊ या काय हानी होऊ शकते ती.

  • ·        यामधील रेडीओ फ्रिक्वेन्सी किरणांपासून आपणास कर्करोग होऊ शकतो
  • ·        नुकत्याच झाल्लेल्या एका अभ्यासानुसार याच्या वापरामुळे ब्रेन टयूमर होण्याची भीती असते
  • ·        जास्त वेळ मोबाईलवर बोलू नये कानास त्रास होऊ शकतो
  • ·        यामुळे आपल्या मेंदूस चालना मिळणे कमी होते
  • ·        लहान मुलांना यापासून वाईट सवयी लागतात
  • या आणि यासारख्या अश्या अनेक कारणांमुळे हा मोबाईल आपल्यासाठी किती धोकादायक आहे हे समजते. तर मग हा मोबाईल जरी फायद्याचा असला तरी तो कमी आणि काम असेल तेवढाच वापरलेला बरा असतो.

Source :- http://www.techibuzz.com/mobile-phone-became-destructor-health/

---------------------------------------------------------------------------


भारतात ऍमेझॉनची क्लाऊड रीडर सेवा लाँच

भारतात नुकतीच ऍमेझॉनने त्याच्या क्लाऊडवर आधारित वाचन सेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे सेवा विनामूल्य उपलब्ध आहे आणि वापरकर्त्यांना कोणत्याही डाउनलोड न करता त्यांच्या वेब ब्राउझर वर म्हणजेच Amazon च्या संग्रहात सर्व पुस्तके उपलब्ध करण्यात आलेली आहेत. ही सेवा क्रोम फायरफॉक्स , सफारी आणि इंटरनेट एक्सप्लोरर ( आवृत्ती 10 आणि त्यावरील) आणि iPad साठी डेस्कटॉप ब्राउझरवर वापरले जाऊ शकते .
क्लाऊड रीडर सेवा आपोआप युझरची क्लाऊड लायब्ररी वाचलेली पृष्ठे,  नोट्स,  बुकमार्क आणि त्यांच्या हायलाइट्स सेव म्हणजेच साठवून ठेवते. क्लाऊड रीडर सेवा नेहमी वापरकर्ते ऑफलाइन वाचनसाठी, पुस्तके जतन करण्यासाठी आणि मजकूर , फॉन्ट आकार आणि बरेच काही करण्यासाठी वापरू शकतात. क्लाऊड रीडर सेवा देखील वापरकर्त्यांना विषयानुसार पुस्तके शोधण्यासाठी मदत करते.
नोट्स आणि हायलाइट्स, बुकमार्क असे वैशिष्ट्ये देखील वापरकर्त्यांना यांमध्ये उपलब्ध आहेत. क्लाऊड रीडर सेवा ब्राउझर हे आपोआप अपडेट होते. अमित अग्रवाल,  व्यवस्थापक, ऍमेझॉन भारत  यांच्या म्हणण्यानुसार एकदा खरेदी करा,  सर्वत्र वाचा या मिशनचा हा एक मोठा टप्पा आहे.

Source :- http://www.thinkdigit.com/Apps/Amazon-Kindle-Cloud-Reader-service-launched-in_20960.html


----------------------------------------------------------------------------------------------------------


झोलो Q600s आणि Q1200 ऑनलाईन उपलब्ध





आज प्रत्येक ई कॉमर्स पोर्टलवर नवीन मोबाईल विकले जातात. याप्रमाणे  Snapdeal या ऑनलाइन पोर्टलने सुद्धा झोलो क्यू६०० एस, क्यू १२०० एस हे दोन नवीन मोबाईल ऑनलाइन उपलब्ध केले आहेत. या दोघांना ग्राहक सध्या केवळ ऑनलाइन विकत घेवू शकतो. यांची वैशिष्ट्य म्हणजे Xolo Q600s मध्ये 

  • ·        Android 4.4 KitKat कार्यकारी प्रणालीचा पहिला Xolo स्मार्टफोन आहे
  • ·        हँडसेटला 960 × 540 पिक्सेल रिझोल्युशन
  • ·        1.2 GHz कोर प्रोसेसर
  • ·        स्क्रीन 4.5 इंच qHD टच स्क्रीन
  • ·        LED फ्लॅश
  • ·        प्राथमिक व्हिडिओ कॉलिंग एक VGA कॅमेरा
  • ·        दुसरा ५ मेगापिक्सेल आहे .
  • ·        स्टोरेज 32 GB  व त्यावर वाढवू शकतात
  • ·        मेमरी कार्ड, अंतर्गत स्टोरेज स्पेस 4 जीबी
  • ·        कनेक्टिव्हिटी:-
  • ·        यामध्ये थ्रीजी , वाय-फाय , ब्लूटूथ आणि जीपीएस आहेत आणि 2,000 mAh बॅटरीचा समावेश आहे.
दुसरीकडे झोलोचा दुसरा नवीन मोबाईल Q1200 याबद्दल बोलायचे तर त्यात 
  • ·        1280 720 × पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशन
  • ·        स्क्रीन संरक्षण करण्यासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास असलेल्या 5 इंच एचडी स्क्रीन प्रगत मल्टिटास्किंग, 1 GB RAM सह 1.3 GHz कोर प्रोसेसर
  • ·        या हँडसेटला सध्या Android 4.2 जेली बीन देण्यात आली असून ती 4.4 KitKat  अपग्रेड केली जाऊ शकते.
  • ·        इमेजिंग साठी, व्हिडिओ कॉल करण्यासाठी समोरील 2 मेगापिक्सेल चा कॅमेरा
  • ·        दुसरा 8 मेगापिक्सेल चा सोनी Exmor आरएस कॅमेरा समाविष्ट
या हँडसेट एक सूक्ष्म SD कार्ड सपोर्ट, 8 GB स्टोरेज स्पेस आहे. इतर थ्रीजी , वाय-फाय

ब्लूटूथ आणि जीपीएस, यूएसबी OTG आणि 2,000 mAh बॅटरी समावेश आहे.

for more info :- http://gadgetstouse.com/news/xolo-q600s-xolo-q1200-launch-price/20701
-------------------------------------------------------------------------------------------
फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये महत्वाचा बदल

फेसबुकने आपल्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेबुक्ने जाहीर केलेल्या एका माहितीनुसार त्याच्या गोपनीयता सेटिंग्ज थोडे बदल झालेत. त्यात प्रामुख्याने आपण शेअर करत असलेले स्टेटस, पोस्ट, फोटो, व्हिडिओ याची दर्शकता अगोदर पब्लिक असायची आणि ती आपल्याला बदलायला लागायची पण ती आता अगोदरच मित्रच पाहू शकतील अशी असेल. यामुळे आपल्या स्टेटस, पोस्ट, फोटो, व्हिडिओ याच्या प्रायव्हसीचा प्रश्न दूर होईल. आपली माहिती कोणीही थेट पाहू शकणार नाही.

याचबरोबर फेसबुक ने आणखीन एक चांगले टूल विकसित केले आहे. त्यामध्ये प्रायव्हसी चेकअप टूल म्हणून एक नवीन अद्यावत पर्याय उपलब्ध केला आहे. त्यात आपण केलेल्या सर्व पोस्ट व इतर माहिती दिसेल आणि त्यावर आपले नियंत्रण राहील. या सर्व सेटिंगसाठी आणि ही माहिती प्रायव्हसीसाठी तब्बल $२० दशलक्ष किंमत मोजावी लागली. असेही कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.


For more Information :- http://www.huffingtonpost.com/2014/05/22/facebook-privacy-settings_n_5372109.html?utm_hp_ref=technology&ir=Technology

----------------------------------------------------------------------------------------------------


जगातील पहिला माउस लाकडाचा

तंत्रज्ञान आणि पर्यावरण याची सांगड अगोदरपासून आहे. पहा ना जगातील माउस हा देखील लाकडाचा बनला होता. माउस चे निर्माते डग्लस इंगाल्बार्त यांनी १९६० च्या दशकात लाकडी माउस तयार केला. त्याचा पेटंट १९७० च्या सुमारास मिळाला. डग्लस यांनी त्याचा पहिला वापर झेरॉक्स अल्टो कम्प्युटर्स सिस्टम सन १९७३ ला केला गेला.

Source http://www.computerhope.com/issues/ch001083.htm

-----------------------------------------------------------------------------------------------------



फेसबुकचा पहिला वापरकर्ता (युजर)


फेसबुक तशी सर्वांना ओळखीची वाटणारी सोशल नेट्वर्किंग साईट ठरली आहे. त्यावरून सध्या बऱ्याच गोष्टी जगात होतात. त्या फेसबुकमध्ये सर्वात अगोदर आपले नाव रजिस्टर कोणी केले असेल ही उत्सुकता तुम्हाला असेलच, ते नाव आहे खुद्द त्याचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याचे. त्याने ४ वेळेस एक डेमो युजर म्हणून तिथे नाव नोंदविले होते. पण या फेसबुकचा तसा पहिला युजर हा अॅरी हसित हा युवक होता. हा युवक सध्या इस्राईलमध्ये यहुदी धर्मगुरूचे शिक्षण घेतोय. त्याचे फेसबुकवर असलेले हे छायाचित्र.

http://finance.yahoo.com/news/the-first-ever-email--the-first-tweet--and-12-other-famous-internet-firsts-181209886.html

----------------------------------------------------------------------------------------------------------------


ऑनलाइन का है जमाना




सध्या प्रत्येक वस्तू ही ऑनलाईन घेतलेली कधीही चांगली असा समाज झाला आहे. अगोदर तुम्ही कुठून वस्तू मागवितात? ती कशी असेल? त्याची क्वालिटी कशी असेल? यासारख्या बऱ्याच गोष्टी अगोदर लोक विचार करीत होते. आता सर्व गोष्टी ह्या इन्टरनेट मुळे खुप फास्ट झाल्यात. यामध्ये त्या ऑनलाईन साईटवर नवीन आत्ता मोबाईल कंपनीज आपले नवीन मोबाईल लौंच करीत आहेत. मोटोरोला, एलजी, micromax यासारख्या मोबाईल कंपनीचा उल्लेख करता येईल.

मोबाईल काय चष्मे, इलेक्ट्रिक वस्तू, ज्वेलरी, कपडे, पुस्तक जवळजवळ सर्वच आत्ता ऑनलाईन मिळायला लागलेत. हे सर्व अगोदर मोबाईल त्यानंतर आता स्मार्टफोन यामुळे ग्राहकांना सर्व पाहणे खरेदी करणे सोपे झाले आहे. पण यामध्ये धोकेही आहेत.

त्यांची माहिती वजा त्याबद्दल घ्यायची काळजी :-

  • ·        आपण आपली बँक माहिती तिथे देत असतो, म्हणून देतांना साईट सेफ आहे का?
  • ·        म्हणजे ती “https” secure सुरक्षित आहे का हे तपासून पहा
  • ·        याचबरोबर किंमत आणि त्यावर असलेली सुट
  • ·        त्यासोबत येणारे उत्पादन खात्रीलायक आहे का?
  • ·        त्याची मुळ किंमत आणि बाजारातील किंमत यामधील फरक
  • ·        त्याची क्वालिटी
  • ·        वेबसाईटची प्रमाणता
  • ·        त्यांची स्कीम फायदेशीर आहे का नाही त्याची तुलना करून पहा
  • ·        त्यांचे डिलिव्हरी चार्जेस, होम डिलिव्हरी इत्यादी पर्याय आहेत आणि कसे आहेत हे तपासा
  • ·        त्यांनी टाय-अप केलेल्या कुरियर ची सर्विस आपल्या गावाला आहे का नाही
  • या आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी तपासून पाहणे महत्वाचे आहे. मग नक्की ह्या गोष्टी तपासून घ्या आणि मगच वस्तू घ्या, म्हणजे तुम्ही स्मार्ट ग्राहक व्हाल.

- गोपाल अनिलकुमार पालीवाल


No comments:

Post a Comment