Smart Apps and Social Website 4 U

स्मार्ट अॅप्स फॉर यु या स्मार्ट सदरमध्ये आजपासून प्रत्येकवेळी आपल्या स्मार्टफोनसाठी काही नवीन आणि माहितीपूर्ण तसेच वापरण्यास सोपे असे स्मार्ट अॅप्स ची माहिती आम्ही देणार आहोत.

गोपाल अनिलकुमार पालीवाल, ९४२३४९१८२३

-------------------------------------------------------

स्मार्ट अॅप्स फॉर यु

१.       मोबाइलसाठी डॉल्फिन ब्राउ



ज्याप्रमाणे डॉल्फिन हा प्राणी इतरांना त्याच्या कारनाम्यांनी आनंद देतो त्याचप्रमाणे हे डॉल्फिन ब्राउ त्याच्या वैविध्यपूर्ण फीचर्सने मोबाईलधारकांना एक छान आणि अनोखा नेट ब्राउझिंगचा आनंद देतो.
यामध्ये अनोखे फीचर्स आहेत. 
त्यात प्रामुख्याने

गेस्टर्स


खाणाखुणा स्क्रीनवर रेखाटले ते वेबपेज उघडते. हे फीचर्स नुकतेच एलजी मोबाईल कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये दिले आहे. या डॉल्फिन ब्राउमुळे आपण मोबाइलवर वेब सर्फिंग सुकर होते. आपल्या fingertip म्हणजेच बोटांच्या स्पर्शाने आपल्या आवडत्या साइट उघडता येतात. एक हृदय रेखांकन करून Match.com  उघडा. बाण रेखांकन करून पेज खाली स्क्रोल करा किंवा एफ चे प्रतीक रेखांकन करून फेसबुक उघडा. याचबरोबर स्वत:च्या कल्पना तयार करून तुम्ही त्याचा वापर याद्वारे करू शकतात.

व्हॉइस शोध (सोनार पद्धती)

म्हणजे पाणी मध्ये बुडालेल्या वस्तूचा ठावठिकाणा ध्वनिलहरींच्या प्रतिध्वनींच्या साहाय्याने निश्चित करण्याचे साधन (किंवा पद्धती) या पद्धतीचा येथे आपल्या आवाजाने ते-ते पर्याय आपण उघडू किंवा वापरू शकतो. जसे, त्याला शेअर सांगून नॅव्हिगेट करण्याची परवानगी देणे. "नवीन टॅब" किंवा "बीबीसी" यासारखे वेबसाइटचे नाव बोलून त्यावर वेब सर्फिंग करू शकतो.
यासारख्या फीचर्ससोबत आणखीन टॅप शेअरिंग, वेब अॅप्स स्टोअर, एड ऑन, फ्लॅश सपोर्ट, शोध सूचना, सुंदर युजर इंटरफेस ही देखील चांगली फीचर्स आहेत.

FOR MORE INFO :- http://dolphin.com/features/

------------------------------------------------------------------------------------------------------------

2. नोव्हा लाँचर



अत्यंत सानुकूल, कार्यक्षमतापूर्ण, होम स्क्रीनसाठी अनोखे आणि आकर्षक पर्याय असलेले नोव्हा लाँचर हे आधुनिक अॅप्स आपल्या स्मार्टफोनसाठी सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे. नोव्हा लाँचरद्वारे आपण आपल्या मुख्यपृष्ठ स्क्रीनवर बदल तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी वापर करू शकता. आपल्या अॅप्लीकेशन चे आयकॉन बदलणे, थीम बदलणे, रंग बदलणे,  त्यांची मांडणी, अॅनिमेशन आणि अधिक बरेच काही यामध्ये समाविष्ट आहे. एकदा नक्की या अॅप्सला वापरून पहा. ही अॅप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर सहजरीत्या उपलब्ध होतील.

FOR MORE INFO :- https://play.google.com/store/apps/details?id=com.teslacoilsw.launcher&hl=en

--------------------------------------------------------------------------------------------------------


Micromax चा युनिट 2 बाजारात



भारतीय मोबाईल कंपनी Micromax चा नवीन अद्यावत युनिट 2 केवळ ६९९९ मध्ये बाजारात उपलब्ध झाला आहे. मोटो ई नंतर एवढ्या कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेला मोबाईल उपलब्ध झाल्याने मोठ्या कंपनीत चिंतेचे वातावरण आहे.
केवळ ६९९९ मध्ये १०००० च्या मोबाईलचे फीचर्स मिळाले तर ग्राहक नक्कीच हा मोबाईल घेतील. यामध्ये विशेष म्हणजे २१ भाषा सपोर्ट करतात. त्यामध्ये , हिंदी , मराठी, तेलगु आहेत. हा त्याचा USP म्हणता येईल.

या मोबाईलला 1GB  RAM त्याचबरोबर 1.3GHz  कोर प्रोसेसर आहे, 32GB पर्यंत विस्तारीत मेमरी जाऊ शकते अंतर्गत संचय म्हणजेच मेमरी 4GB, 800x480 रिझोल्युशन आहे. नवीन Android KitKat 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम याला दिली आहे. या स्मार्टफोनला 4.7 – इंच स्क्रीन, ५ एमपी कॅमेरा फ्लॅश आणि समोरील कॅमेरा 2 एमपी आहे तसेच 2,000 mAh बॅटरी आहे. हा मोबाईल ग्रे, लाल, पांढऱ्या आणि हिरवा अश्या चार रंगात उपलब्ध आहे. Micromax ने यामध्ये विशेष करून त्यांचे MAD , Getit , Kingsoft ऑफिस, हायकिंग , एम! गेम्स,  एम लाईव इत्यादी लोड केलेत.

आमचे ध्येय देशातील जनतेला संवाद साधतांना तसेच मनोरंजनासाठी आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी कोणत्याही अडथळा नको, त्यांच्या भाषेत कनेक्ट करण्यासाठी आमच्या ग्राहकांना एक शक्तिशाली माध्यम देणे हाच उद्देश असल्याचेही शुभोदीप पाल, सीएमओ, Micromax यांनी सांगितले.

FOR MORE INFO :- http://www.gizmodo.in/indiamodo/Micromax-Unite-2-Launched-For-Rs-6999/articleshow/35480449.cms

----------------------------------------------------------------------------------------------------------------


जॉबसाठी लिंक्ड-इन चे नवीन अॅप्स



पूर्णपणे बिजनेस सोशल नेट्वर्किंग साईट असलेली लिंक्ड-इन ने नुकतेच जॉब किंवा नोकरी शोधणारयासाठी एक नवीन अॅप्स बाजारात आणले आहे. ज्याद्वारे आपण योग्य आणि सोप्या पद्धतीने नोकरी शोधू शकतो. आपण सध्या वेगवेगळ्या साईटवर जाऊन नोकरी शोडतो. तेथे काही खरी काही खोटी अशी माहिती असते, त्याचबरोबर तेथे कोणीही चांगला सल्ला देणारे कमी असतात. याला उत्तम पर्याय म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. याला वापरणे अगदी सोपे आहे. तुम्ही केवळ लिंक्ड-इन वर युजर म्हणून रजिस्टर असायला पाहिजे.

याचे नाव जॉब-शोध असे ठेवले आहे. यामध्ये तुम्ही शोधात असलेली माहिती ही पूर्णपणे खाजगी आणि आपल्या नेटवर्कमध्ये कोणालाही दिसणार नाही, ती केवळ तुम्हीच पाहू शकतात असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. याबद्दल जास्त माहिती देतांना प्रवक्ते म्हणाले की, यामध्ये जेव्हा तुम्ही नोकरी शोध कराल तेव्हा तो पूर्ण शोध हा तुम्ही दिलेल्या पर्यायाने शोधून तुम्हाला दिला जाईल. म्हणजे अधिकारी स्तर, उद्योग आणि स्थान यासारखे जॉब शोध फिल्टर यांमध्ये समाविष्ट केले आहे. हे जॉब-शोध अॅप्स सध्या केवळ यूएस मध्ये उपलब्ध आहे आणि ऍपल अॅप स्टोअरमधून त्याला डाऊनलोड करू शकता.

FOR MORE INFO :- http://gadgets.ndtv.com/apps/news/linkedin-unveils-new-app-for-job-seekers-545481

--------------------------------------------------------------------------------------------------------


इंटेलचे संदेश पाठविणारे नवीन अप्स

(वृत्तसंस्था) – इंटेल या संगणक क्षेत्रातील कंपनीने नुकतेच नवीन अप्स आणले आहे. ज्यामध्ये संदेश पाठविणार्याचे चित्र हे एका कार्टून च्या सारखे दिसणार आहे. हे व्यंगचित्र करण्यासाठी चेहरयाचा ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरून स्मार्टफोनसह व्हॉइस इन्स्टंट मेसेजिंग मध्ये पाठविता येणार आहे.

पॉकेट अवतार या नावाने हे माईक बेल यांनी एक कार्यक्रमात सुरु केले. यामुळे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान बदल होतील असेही इंटेलकडून सांगण्यात आले. कार्टूनचा अवतार करण्यासाठी चेहऱ्यावरील भाव इत्यादी तसेच संदेश रेकॉर्ड करण्यासाठी स्मार्टफोन कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरते.

एक मुलाखतीत, बेल यांनी सांगितले की हे ट्रॅकिंग तंत्रज्ञान Android स्मार्टफोन आणि iPhones  या दोघांवरही मोफत आहे. इंटेलच्या या नवीन अप्समुळे स्मार्टफोन बाजारात खूप मोठी स्पर्धा होणार आहे असे दिसते.

FOR MORE INFO :-  http://feeds.reuters.com/~r/reuters/INtechnologyNews/~3/pT9smC0yhxk/us-intel-messaging-idINKBN0EU1IV20140619

-----------------------------------------------------------------------------------------


सतत अपडेट होणारी जीवनशैली आणि त्यासोबत वाढणारे सोशल साईट यामध्ये अस्तित्वात असलेले पण आपण फेसबुक सारखे त्याचा प्रेमात नाही पडलो. अश्या काही सोशल साईट ची माहिती.

मैत्रीची नवीन खिडकी : फ्रीडो





फ्रीडो (Fridow) ही सोशल साईट भारतीय आहे. फ्रीडो हे नाव तसे नवीन असून त्यात दोन महत्वाची नावे लपली आहेत. एक म्हणजे फ्रेंड्स (friend) आणि दुसरे विंडो (window) अर्थातच “मैत्रीची खिडकी”. भारीत्या असल्याने पाहिजे तसा प्रतिसाद अजून तरी या साईट ला मिळाला नाही. पण यात तुम्ही मित्रांशी, आपले शहर, आपली भाषा, आपल्या वैवाहिक स्थिती, रुची आणि छंद, आपली शाळा आणि कॉलेज सारख्या आपली वैयक्तिक माहिती शेअर करू शकता. आपण इच्छित वैयक्तिकरित्या तपशील, गोपनीयता सेटिंग सेट करू शकता. आपण प्रोफाइल चित्र सेट करू शकता. आपण फोटो आणि व्हिडिओ शेअर करा अपलोड करू शकता. प्रत्येकासाठी आपले विचार, संदेश अपलोड करू शकता. आपण कोणत्याही साइटच्या दुवा (लिंक) अपलोड करू शकता, त्याचबरोबर यात आपण तारीख आणि वेळ सह, आपल्या प्रोफाइल भेट दिलेल्या शेवटच्या 20 लोकांना पाहू शकतो.

----------------------------------------------------------------------------------------

बनवा मित्रांना आपले चाहते



Fan2Go  ही सुद्धा भारतीय आय टी कंपनीने बनविलेली सोशल नेटवर्किंग साइट आहे. यावर तुम्ही नवीन लोकांशी भेटू शकतात आणि त्यांना आपले चाहते बनवू शकतात. म्हणजेच भेटा नवीन लोक, चाहता व्हा आणि चाहते मिळवा!

असं या साईटचा उद्देश आहे. मित्रांसोबत गप्पा, फोटो शेअर, व्हिडिओ शेअर, ब्लॉग, संगीत ही वैशिष्ट्ये आहेत. फेसबुक ची अंगवळणी झाल्याने भारतातील या नवीन साईट ला लोकप्रिय होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. असे यावरून तरी दिसते.

FOR MORE INFO :- http://www1.fan2go.com/

-----------------------------------------------------------------------------------------

फेसबुक चा नवीन स्पर्धक : झोर्पिया



Zorpia ही सोशल साईट भारत आणि चीन मध्ये लोकप्रिय अशी नेटवर्किंग सेवा आहे. Zorpia ही एक चीनी इंटरनेट सोशल नेटवर्क साईट आहे. जिथे चीनमध्ये फेसबुक आणि ट्वीटर वर बंदी आहे तेथे झोर्पिया या चीनी सोशल साईट साठी चांगला वाव आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करता यावा यासाठी या साईट सध्या उपयोगी पडतांना दिसतात. यामुळेच चीनी सरकारने फेसबुक आणि ट्वीटर यावर बंदी घातली. झोर्पिया या साईटचेही प्रत्येक महिन्याला नवीन 2 दशलक्ष वापरकर्ते आहेत. जगभरात एकूण २६ दशलक्ष वापरकर्ते आहेत. पण आपल्याला केवळ फेसबुक माहिती आहे. यामध्ये बरीच वेगळी आणि चांगली फीचर्स आहेत. 

Zorpia च्या वैशिष्ट्यांबद्दल फोटो शेअरिंग, सोशल नेटवर्किंग, मेसेजिंग आणि प्रोफाइल इत्यादी. Zorpia विश्लेषण आणि अनोळखी मित्र ओळखण्यासाठी आणि करण्याकरीता ओळख प्रतिबंध प्रणाली व डिस्कवरी अल्गोरिदम विकसित केले आहे.

FOR MORE INFO :- http://www.zorpia.com


----------------------------------------------------

सोशल साईट ती पण शिक्षणासाठी !!



आपण सध्या स्मार्टफोन वापरामुळे खूप स्मार्ट झालो आहोत. पण त्याहूनही स्मार्ट तंत्र आणि त्यापासून तयार होणारे विविध सोशल साईट. यात आणखी एका साईटची भर पडली आहे. फोटोपीच या फोटोशी निगडीत असलेल्या सोशल साईट ही काहीसी आगळीवेगळी आहे. म्हणजे यात तुम्ही आपले म्हणणे व्हिडीओ बनवून जगभरात शेअर करू शकतात.

ही साईट सर्वात जास्त लोकप्रिय आहे ती अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आयर्लंड, स्वीडन मधील शाळांमध्ये. जिथे याचा वापर शेकडो विद्यार्थी आपले सादरीकरण, शिक्षक आपली क्लास तसेच लेक्चर याद्वारे जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवितात. आणि ते देखील अगदी इंटरअक्टीव पद्धतीने. केवळ व्हिडीओ शेअर करणे या साईटचा उद्देश नसून त्याचा अभ्यासासाठी कसा चांगला वापर करता येईल याचीही काळजी या कंपनीने घेतली आहे. त्यांनी शाळेसाठी, शिक्षकांसाठी विविध मेंबरशिप उपलब्ध केळे आहे. याद्वारे शिक्षक सादरीकरण, साउंडट्रॅक, क्विझ हे शेअर करू शकतात आणि त्याद्वारे ते शिकू शकतात. कारण आजकालच्या मुलांना पाहिलेले लवकर लक्षात येते ना! 

FOR MORE INFO :- http://photopeach.com/

------------------------------------------------------------------------------------------


फेसबुकचे खास बातम्यांसाठी न्यूजवायर टूल



पत्रकारांसाठी फेसबुकने नुकतेच न्यूजवायर हे नवीन फीचर्स सुरु केले आहे. त्याची लिंक https://www.facebook.com/FBNewswire असून त्यावर याची माहिती देण्यात आली आहे.

याद्वारे फेसबुकच्या वेबसाईटवरील सदस्यांना त्यांची छायाचित्रे किंवा माहिती शेअर करता येतील. यासाठी फेसबुक न्यूज कॉर्पच्या स्टोरीफुल मीडिया टूलबरोबर काम करीत आहे. त्यामुळे ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बातम्या आणि व्हिडिओचे कॉपीराईट ओळखणे आणि ते ताब्यात ठेवणे शक्य होणार आहे. एफबी न्यूजवायरची घोषणा करताना फेसबुकमधील न्यूज अँड ग्लोबल मीडिया पार्टनरशिपचे संचालक अँडी मिशेल यांनी सांगितले, की आता फेसबुकवर बातम्यांना कोणत्याही वेळी अधिकाधिक वाचक मिळत आहेत. फेसबुकने न्यूजवायरचे ट्विटर अकाउंटही (@FBNewswire) सुरू केले आहे.

बातम्या पूर्वीपेक्षा फेसबुकव एक मोठा प्रेक्षक मिळतो. त्यात पत्रकार आणि मीडिया संस्था यांनी हे वापरले तर विविध विषय, आर्टिकल आणि बातम्या, अलीकडील झालेले बदल यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी हे फायद्याचेच आहे.  फेसबुक हे आत्ता अविभाज्य अंग झाले आहे. या न्यूजवायर मुळे येणाऱ्या दिवसात मीडिया संस्था आणि पत्रकार यांचे काम भरपूर सोपे होणार आहे.


--------------------------------------------------------------------------------------------

कोर्सेरा : विनामूल्य शिका ऑनलाइन जगातील सर्वोत्तम अभ्यासक्रम


कोर्सेरा ही वेबसाईट आपल्याला जगभरातील प्रसिद्ध विद्यापीठे आणि संस्था यांचे कोर्सेस विनामूल्य, आणि ऑनलाइन कोर्स ऑफर देणारे एक शिक्षण व्यासपीठ आहे. यामध्ये आपल्याला आपले जीवन, आपल्या कुटुंबांची जीवनशैली आणि यासोबत शिक्षण घेण्याचा लोकांना अधिकार मिळतो. ही कंपनी अँड्र्यू एन.जी. आणि डाफ्ने कोलार यांनी स्थापन केली. ही ऑनलाइन कोर्स देणारी एक शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे.

या वेबसाईटचा मुख्य उद्देश हाच आहे की सर्व लोकांना शिक्षण मिळायला हवे. त्यांचे स्लोगन हेच आहे, एज्युकेशन फॉर एव्हरीवन. जेणेकरून जगभरातील लोकांना शिक्षणाद्वारे आपले जीवन सुधारता येईल. यासोबत जगभरातील विविध विद्यापीठांतील कोर्स करण्यास मदत होईल. या साईटवर ऑनलाईन कोर्स असणाऱ्या विद्यापीठांचे पूर्ण माहिती आहे. या साईटबद्दल आणखी माहिती https://www.coursera.org/ यावर जाऊनच कळेल.

FOR MORE INFO :- https://www.coursera.org/

------------------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment