Wednesday, 25 April 2012

नंदन निलेकणी : एक दूरदृष्टी ठेवणारा तंत्रज्ञ

नावातच ज्यांच्या नंदन आहे असे हे उत्तर कर्नाटक मधील सिरसी या गावी जन्माला आले. त्यांच्याबद्दल नेटवर बरीच माहिती उपलब्ध आहेच, म्हणून मी काही तीच पुन्हा  सांगणार नाही. निलेकणी हे एक दूरदृष्टी असणारे तंत्रज्ञ कसे हे सांगणार आहे.
त्यांना घरातूनच अभ्यासपूर्ण वातावरण मिळाले. त्यांनी ठरविले होते मोठा माणूस व्हायचे तसे ते झालेही. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण आयआयटी मुंबई येथून १९७८ ला पूर्ण केले. त्यांची पहिली कंपनी ही पटनी कम्प्युटर कंपनी होती. तेथे त्यांची मुलाखत ही खुद्द एन. नारायणमूर्ती यांनी घेतली होती. यावरूनच त्यांची बुद्धीमत्ता आपल्याला स्पष्ट होते. आपल्या आयटी प्रवासात त्यांनी भरपूर प्रमाणात चढउतार पाहिलेत.


नंदन निलेकणी 


भारताच्या ‘अनोखे नागरिक ओळखपत्र’ (यूआयडी) मोहिमेचे विद्यमान प्रमुख नंदन निलेकणी यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे प्रख्यात स्तंभलेखक थॉमस फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ असे विधान केले. त्यावेळेस माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वांनाच निर्माण झालेल्या समान संधींविषयी त्यांना बोलायचे होते. त्यांची दृष्टी ही अतिशय स्पष्ट आणि प्रगतीशील आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर हा देशासाठी केला. लोकपाल आणि भ्रष्टाचारावर त्यांनी हाच एक मार्ग नसून त्यासाठी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेथे अमेरिका ४ जी वापरते तेथे भारत अजूनही २ जी त अडकलेला आहे. भारतात निलेकणी सारखे आयटी तज्ञ आहेत पण खंत ती एकाच त्यांच्या बुद्धीचा वापर किंवा त्याला योग्य सहयोग, मान दिला जात नाही.

नंदन निलेकणी

आपल्या ३० वर्षाच्या आयटी कारकिर्दीत नाव कमविणारे निलेकनींवर पंतप्रधान यांनी एक महत्वाची जबाबदारी टाकली ती म्हणजे त्यांना राष्ट्रीय ओळखपत्र प्राधिकरण प्रमुखाची याला ते योग्यरित्या सांभाळता आहेतच. विशेषतः त्यांनी याचबरोबर सिलेंडर सुद्धा ऑनलाईन मिळणार यासाठीही प्रयत्न केलेत. यांसारखे माणसे ही केवळ नावाने नाही तर त्यांनी केलेल्या कामांनी ओळखली जातात यात तिळमात्रही शंका नाही.

या माणसाने आपल्या बुद्धीचा वाईट गोष्टीसाठी वापर कधीच केला नाही. एका जागतिक क्रमवारीतील आयटी कंपनीचे सह संस्थापक पद सोडून सरकारी कार्यात आपला सहभाग नोंदविणारे नंदन निलेकणी हे मोजक्या भारतीयांपैकी एक. त्यांचा एक गुण प्रत्येक तरुणाला घेण्यासारखा आहे तो म्हणजे "कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला कमी लेखू नये. त्याचा डटके मुकाबला करावा." 


निलेकणी हे २००२ ते २००७ पर्यंत इन्फोसिस चे सीईओ होते. त्यानंतर त्यांना २००९ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रीचा दर्जा असलेल्या पदावर नियुक्त केले ते म्हणजे Unique Identification Authority of India च्या चेयरमनपदी.  या लेखासाठी निलेकनींवर लिहायचे ठरवल्यावर त्यासाठी भरपूर वाचावे लागले. अभ्यास करावा लागला.


चला तर पुन्हा भेटूया एक नवीन आणि आयटीसंपन्न असलेल्या व्यक्तीच्या माहितीसोबत याच तुमच्या आपल्या आयटी च्या गावात.


Saturday, 21 April 2012

सुहास गोपीनाथ - सायबर कॅफे ते ग्लोबल कंपनी

बिल गेट्स ची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आपली पण स्वतःची  एक कंपनी असावी असे स्वप्न पाहणाऱ्या सुहास गोपीनाथ ची ही गोष्ट.....!!

Mr. Suhas Gopinath








एखाद्या मोठ्या आयटी कंपनीचा सीईओ होणारे लोक आपण पहिले आहेत. परंतु वयाच्या १४ व्या स्वतःची वेबसाईट बनवून एका कंपनीची मुहूर्तमेढ करणारा सुहास गोपीनाथ म्हणजे युवकांसाठी एक आदर्शच ! हे यश सुहास ला सहजासहजी मिळालेले नाही. आपल्या अमुलाग्र बुद्धीने १४ व्या वर्षीच हा चमत्कार करणारा सुहास गोपीनाथ हा आयटी सिटी बंगळूरचा. त्याचा जन्म ४ नोव्हेंबर १९८६ चा.


सुहास तसा मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्याला केवळ १५ रुपये खर्चाला मिळायचे. त्यासोबत एका इंटरनेट कॅफे वर नौकरी करून आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची सुरुवात केली. तेथूनच हा प्रवास सुरु झाला. 

 सुहासने ही कंपनी सुरु केली त्यावेळेस कोणाला वाटले ही नव्हते की ही कंपनी अब्जावधीची उलाढाल करेन. पण पाहता पाहता 'ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड' नावाची कंपनी थेट कॅलिफोर्निया पर्यंत पोहोचली. या कामगिरीबद्दल सुहास गोपीनाथला कर्नाटक सरकारच्या  पुरस्कारासह आंतरराष्टीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यात २००७ मध्ये युरोपियन संसदेचा यंग अचीव्हर अवार्ड, २००८-०९ दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिलेला यंग ग्लोबल लीडर्स अवार्ड याचा समावेश आहे.

Suhas Gopinath with Great Mr. A.P.J. Abdul Kalaam

आज सुहास गोपीनाथ हे ५०० हून जास्त कर्मचारी असलेल्या ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड या कंपनीचे प्रेसिडेंट आहेत. जगातील विविध संस्थांनी गौरविलेले हे व्यक्तिमत्व भारतीय असल्याचा आम्हाला अभिमानच वाटतो. बीबीसी, वाशिंग्टन टाईम्स, दि एज आदींनीही गौरव केला आहे.
भारतीय माध्यमे त्यांना हिंदुस्तानी बिल गेट्स म्हणून संबोधतात. कारण सुहासचे प्रेरणास्त्रोत बिल गेट्स हेच आहेत. स्वतः बिल गेट्स यांनी भारतभेटीत "मी तुझ्यापासून सावध राहिले पाहिजे" असे सांगितले.

यावरून सुहास गोपीनाथ यांचे कर्तृत्व लक्षात येते.  सुहासचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे एवढ्या लहान वयात आकाशाला गवसणी घालूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. हे विशेष.

Wednesday, 18 April 2012

'आयटी' चा भगीरथ - स्टीव्ह जॉब्ज

Sir Steve Jobs

आय फोन चे निर्माते असणारे स्टीव्ह जॉब्ज नुकतेच आयटी जगताला अलविदा करून गेले. मनाला चटका लावणारी ही गोष्ट माझ्या वाढदिवशी घडावी हा दुखद योगायोगच. पण नियती समोर कोणाचे चालत नाही, असो वयाच्या १९ व्या वर्षी इलेक्ट्रिकची माहिती आणि मित्राची सोबत घेऊन Apple  कंपनीची सुरुवात मुहूर्तमेढ रोवली. ती केवळ १३०० $ च्या तोडक्या भांडवलावर हे विशेष. आपल्या अपरिमित आत्मविश्वासाने आणि जिद्दीने त्यांनी कंपनीचे भाग भांडवल ६० कोटी $ वर पोहोचविले.
१९८४ मध्ये जगाला एक अवलिया माणसाची ओळख खऱ्या अर्थाने झाली ती  Apple ने काढलेल्या त्यांच्या पहिल्या उत्पादनाने. पुढे स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनात बऱ्याच अश्या गोष्टी घडल्या ज्याने त्यांना जगाला जिंकण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या प्रत्येक भाषणात एक नाविन्यता आणि आत्मविश्वास वाटायचा. विशेषतः लहानपणी केलेल्या खोड्या आणि आत्ताचे जीवन यांचा सुरेख संगम ते घालत. त्यांच्या प्रत्येक हरकतींवरून ते स्पष्टही होत असे. कधी कधी एकांतात रमणारे स्टीव्ह अचानक गोतावळ्यात येऊन आपल्या शैलीत गाणेही गुणगुणायचे. वाद आणि त्यांची चांगलीच गट्टी होती. त्यात कॉलेज मधून हकालपट्टी, Apple मधून पायउतार, नावाची चोरीचा वाद असे एक न अनेक वाद सांगता येतील. परंतु या आय.टी. च्या भगीरथाने आत्मविश्वासाने, साहसाने या संकटांचा सामना करून जगात आयटी ची गंगा अवतरण्यात खरी भूमिका बजावली. हे नाकारता येणे शक्यच नाही.

वयाच्या १५ व्या वर्षीच युवक-युवती आय फोन वापरायला शिकतात ते केवळ या सर स्टीव्ह जॉब्ज यांच्यामुळेच. पण त्याचबरोबर ते व्यसनाधीन ही तितक्याच लवकर होतात, याउलट स्टीव्ह जॉब्ज हे २५ व्या वर्षीच लक्षाधीश बनले होते. सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या माझ्यासारख्या युवकांनी ही प्रेरणा घेऊन आपले करियर सेट करणे गरजेचे आहे न की व्यसनाधीन होणे. युवकांच्या हातातले खेळणे म्हणजे मोबाईल, आय फोन, आय पॉड, स्मार्ट फोन हे सर्व ह्याच भगीरथाच्या देणग्या आहेत.

सर स्टीव्ह जॉब्ज
ज्यावेळेस स्टीव्ह यांनी बिल गेट्स ची भेट घेतली त्यावेळी आपल्या नम्र आणि सोज्वळ स्वभावाची जाणीव पूर्ण जगाला करून दिली. आय टी विश्वातील एक धगधगता योद्धा आपल्यातून निघून गेल्याचे शल्य कधीही न संपणारे आहे. आय-फोन, आय-पॉड, आय-मोव्ही, आय-ट्युन्स अशा 'आय'संपन्न गोष्टी या आय टी च्या ग्लोबल गावात म्हणजेच जगभर पसरवल्या. खऱ्या अर्थाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परिवर्तनाचे वारे आणि ते सातत्याने काहीतरी नवीन आणून टिकवून ठेवणे हे केवळ सर स्टीव्ह जॉब्ज च करू शकतात असे वाटते.
एक दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला हा माणूस जेव्हा एखाद्या कंपनीचा सीईओ होतो, तेव्हा त्यांच्या रुबाबापेक्षा  त्यांच्या मनातील आय टी साठी असणारी धडपड महत्वाची वाटते. केवळ ५६ वर्ष जगून या माणसाने अनेक बदल घडवून आणले. आज सोशल साईट्स क्रांती होत असेल परंतु 'आय टी' उत्क्रांती सर स्टीव्ह जॉब्ज यांनीच घडवून आणली असे मला वाटते.
शेवटी सर स्टीव्ह यांचे एकाच वाक्य सांगावेसे वाटते की जे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतांना सांगितले ते म्हणजे, प्रवाहाविरुद्ध जाण्याअगोदर आपण प्रवाहासोबत चालणे सूद्धा शिकले पाहिजे जेणेकरून त्यांच्याविरुद्ध गेल्यावर आपल्याला येणाऱ्या संकटांचा मुकाबला करणे सोपे जाईल.

Thursday, 5 April 2012

थोडं ब्लॉग च्या नावाबद्दल ..............!!

माहिती तंत्रज्ञान या शब्दाची फोड म्हणजे तंत्रज्ञानाने सहज उपलब्ध होणारी माहिती. जनसामान्यांपासून तर धनदांड्ग्यांपर्यंत सर्वांना एकाच मापदंडात बसविणारे हे प्रगतीशील तंत्रज्ञान भारतात १९९० पासून सुरु झाले, नावरुपाला आले. तेथून सुरु झालेली ही वाटचाल आज विविध पैलु जगासमोर या ब्लोग च्या माध्यमातून माझ्या शब्दांत सांगत आहे. 


भारत म्हणजे तंत्रज्ञानाचे माहेरघर आहे. पुणे ते बंगलोर असा प्रवास सर्वाना ज्ञात आहेच. यात मी प्रामुख्याने आय.टी. तील महारथींचे मला समजलेले विचार माझ्या शब्दांत सांगणार आहे, तरी आपण यावर आपले मुक्त विचार, मत तसेच सुधारणाही सांगू शकतात.


धन्यवाद..............!!